भारतासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन शहरातील लालबहादूर शास्त्री चौक जालगार गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा आपला गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेता आहे. हा निर्णय घेणारे हे शहरातील पहिले सार्व.गणेशोत्सव मंडळ आहे.
जालगार गल्ली येथील कालिका मंदिर येथे आज शुक्रवारी सायंकाळी सार्व. गणेशोत्सव मंडळ लालबहादूर शास्त्री चौक, जालगार गल्ली या मंडळाची वार्षिक बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय एकमताने घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र गिंडे हे होते. भारतासह जगभरात कोरोना प्रादुर्भावाचे थैमान सुरू आहे. कोरोनाचे हे संकट लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा तसेच श्री गणेश मूर्तीची उंची 5 फूट ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या परवानगीने अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी संजय नाईक, रवींद्र टोपाजीचे, अरविंद गिंडे, प्रदीप किल्लेकर, संदीप किल्लेकर, शुभम चिमडे, अमोल गिंडे, सुधीर गिंडे, सुधीर सावंत आदींसह मंडळाचे अन्य सभासद उपस्थित होते.