कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि देशातील जनतेला उत्तम आयुरारोग्य लाभावे यासाठी पाटील गल्लीतील जागृत शनी मंदिरात शनी होम करण्यात आला.आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते मंदिरात संकल्प करून गणेश,नवग्रह पूजन करण्यात आले .
संकल्प करून आमदार अनिल बेनके यांनी देवाकडे प्रार्थना करून कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून साकडे घातले.शनी पूजनात मामा,भाच्याचे महत्व असते म्हणून आमदार अनिल बेनके आणि त्यांच्या भाच्याच्या हस्ते शनी शांती आणि होमाचे विधी करण्यात आले.
यावेळी ब्रम्हावृदांच् मंत्रोच्चाराने मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.बाळकृष्ण तोपीनकट्टी यांच्या नेतृत्वाखाली कांगले गल्लीतील एकता युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.शनी होमचे पौरोहित्य विकास जोशी,प्रसाद गोडसे,नागेश देशपांडे ,ओगले गुरुजी यांनी केले.मंदिराचे ट्रस्टी आनंद अध्यापक,प्रकाश अध्यापक,विलास अध्यापक,श्रीकांत अध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली शनी होमचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राजू उबळकर,बाबासाहेब हट्टीकर,
सदानंद हावळ, बाळू काकतकर,रेखा पवार,ज्योती कांगले,ईश्वर नाईक,विक्रांत बोंगाळे, सिद्धार्थ भातकांडे, आदी उपस्थित होते.