जलाशयांमध्ये पाण्याचा साठा असून देखील योग्य नियोजन नसल्याने पाणी पुरवठा वेळेत होत नाही. यासाठी योग्य नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत व योग्य प्रमाणात केल्यास पुढील काळात जनतेला पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ येणार नाही. मात्र पाण्याचा दुरुपयोग होत असल्यामुळे पाण्यासाठी अनेकजणांना भटकंती करायला लागत आहे.
जल है तो कल है अशा जाहीराती वारंवार दाखवून देखील पाण्याचा दुरुपयोग केला जातच आहे.जलाशयात पाणी उपलब्ध असताना जनतेच्या तक्रारी येत असतील तर त्याला सरकारी नियोजनाचा हेळसांडपणा म्हणावा लागेल. अशा तक्रारी आल्यास कठोर कारवाई करुन संबंधित अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देऊन कारवाई केल्यास यापुढे अशा तक्रारी वाढणार नाहीत. त्यामुळे पाण्याचे संवर्धन आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा, याबाबत पहिल्यांदा संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.
पाणीसमस्येबाबत नागरिकांना त्वरित सुविधा मिळावी याकरिता २४ तास मदत केंद्र सुरू करण्याची गरज आहे. मात्र या ठिकाणी केंद्रच नसल्याने पाण्यासाठी कोणाकडे हाक मारावी ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दुष्काळामुळे पाण्याची समस्या गभीर बनत चालली आहे. पण शहराला पाणी पुरवठा सध्या जलाशयामधून आहे. मात्र पाण्याच बितरण नियोजनबद्धरित्या होत नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत. मात्र याचे सायरसुतक पाणी पुरवठा विभागाला नसल्यानेच दिसून येत आहे.
त्यातच जिल्हाधिकायानी सबधित विभागातील अधिकाऱ्याना बालावन याबाबत गामभिर्याने बैठक घेण्याची गरजही आहे. पाण्यासाठी नागरिक फोन करत असतात पण तो उचलला जात नाही. यामुळे जनतेला पाणी येणार की नाही हे समजणं अवघड बनले आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र हेच पाणी पुढील वर्षी असे वापरता येईल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.