Thursday, January 2, 2025

/

बेळगाव मार्गे 2 जूनपासून सुरू होणार द्वी साप्ताहिक संपर्क क्रांती स्पेशल रेल्वेसेवा

 belgaum

भारतीय रेल्वे खात्यातर्फे बेळगाव मार्गे जाणारी रेल्वे क्र. 02629/02630 यशवंतपुर – हजरत निजामुद्दीन – यशवंतपुर ही द्वी साप्ताहिक संपर्क क्रांती स्पेशल रेल्वेगाडी येत्या मंगळवार दि. 2 जून 2020 पासून दर मंगळवारी आणि गुरुवारी यशवंतपुर येथून, आणि शुक्रवार दि. 5 जूनपासून दर बुधवारी व शुक्रवारी हजरत निजामुद्दीन येथून सुरु होणार आहे.

रेल्वे क्र. 02629 यशवंतपुर – हजरत निजामुद्दीन द्वी साप्ताहिक संपर्क क्रांती स्पेशल रेल्वेगाडी यशवंतपुर येथून निघाल्यानंतर आपल्या प्रवासाच्या मार्गावर तुमकुर, अरसिकेरे, दावणगिरी, हावेरी, हुबळी, धारवाड, बेळगाव, मिरज, पुणे, मनमाड, भुसावळा, भोपाळ आणि झांसी या रेल्वे स्थानकावर थांबून हजरत निजामुद्दीनच्या दिशेने प्रयाण करेल.

त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 02630 हजरत निजामुद्दीन – यशवंतपुर ही द्वी साप्ताहिक संपर्क क्रांती स्पेशल रेल्वेगाडी हजरत निजामुद्दीन येथून निघाल्यानंतर आपल्या प्रवासाच्या मार्गांवर झांशी, भोपाळ, भुसावळा, मनमाड, पुणे, मिरज, बेळगांव, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगिरी, अरसिकेरे व तुमकुर या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊन यशवंतपूरच्या दिशेने रवाना होईल.

ही रेल्वे दर गुरुवारी बेळगाव रेल्वे स्थानकावर दाखल होऊन यशवंतपुरच्या दिशेने जाईल. उपरोक्त रेल्वेसेवा पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.