belgaum

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी उजळणी वर्ग

0
674
Suresh kumar education minister
Suresh kumar education minister karnataka
 belgaum

दहावीची परीक्षा घेण्यासाठी दहावी बोर्ड तयारी करत आहे.याचाच एक भाग म्हणून इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उजळणी वर्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.चंदन वाहिनीवर 9 मे ते 7 जून या कालावधीत इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडे नऊ ते अकरा या वेळेत उजळणी वर्गाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

45 मिनिटांचे दोन उजळणी वर्ग घेतले जाणार आहेत.गणित,विज्ञान,समाजविज्ञान,हिंदी तृतीय भाषा,संस्कृत पहिली भाषा आणि उर्दू पहिली भाषा या विषयांचे उजळणी वर्ग प्रक्षेपित केले जाणार आहेत असे शिक्षण खात्यातर्फे कळविण्यात आले आहे

दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याने राबवलेल्या उजळणी वर्गाचा फायदा विध्यार्थ्याना निश्चित होणार आहे.या उजळणी वर्गाची माहिती विध्यार्थ्यां पर्यन्त पोचवण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक यांनी प्रयत्न करायला हवेत ही माहिती विध्यार्थ्यां पर्यन्त पोचवली पाहिजेत असा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे.

लवकरच शिक्षण खाते दहावीची परिक्षा घेण्याची तयारी करत असून वेळा पत्रक देखील लवकरच जाहीर होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.