केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या नावाचा वापर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या नावे किट देण्याचे सांगून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र नागरिकांनी किट देणार अशी माहिती मिळताच काडा कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती.
केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी काडा कार्यालयामध्ये किट वाटणार म्हणून काही जणांनी खोटया बातम्या पसरविल्या. त्यामुळे वडगाव शहापूरसह परिसरातील विणकर आणि इतर समाजातील नागरिकांनी व महिलांनी काडा कार्यालयासमोर सकाळी ७ वाजताच रांगा लावल्या. मात्र याची पुसटशीही कल्पना खासदारांना नव्हती.
दोन्ही बाजुला लांबच्यालांब रांगा लागल्याने एकच गोंधळ उडाला. तातडीने या घटनेची माहिती केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना देण्यात आली. ते सकाळी ११ वाजता दाखल होवून उपस्थितांची समजूत काढली. आम्ही अशा प्रकारे कोणतेन कीट वाटणार नाही. तुम्हाला कोणी सांगितले? असे विचारले. त्यावर आम्हाला काही जणानी तोंडीच माहिती दिली. त्यामुळे सकाळी ७ वाजतान आम्ही येथे आल्याने उपस्थितानी सागितले.
हातामध्ये आधारकार्ड रेशनकार्ड घेऊन अनेक जण उपस्थित होते. मात्र ही खोटी माहिती कोणी दिली? हे मात्र गुलदस्त्याता राहिले आहे. कितूर चन्नम्माच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बागुला लावण्यालाच रांगा लागल्या होत्या. कोरोनामुळे सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे होते. मात्र त्या नियमाना मुठमाती देवून नेवळ नीटस्साठी लागलेल्या रांगा पाहता साऱ्यांना जानवले. प्रत्येक जण किट हवे आहे असे सागत होते. मात्र कोण देणार हे कोणाला माहिती नव्हते. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अगडी यांना याबाबत विचारले असता मी कोणालानी माहिती दिली नाही. मला देखील महिती नाही. जाणूनबुजून कुणीतरी असा खोडसालपणा केला आहे. यासंबंधी नागरिकांना विचारले असता आम्हाला ही माहिती आम्हाला तोंडी दिली आहे. मात्र आपण किट देणार आहात म्हणून आम्ही इथे आलो आहोत, असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित नागरिकांची नावे नोंदवून घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र आता ज्यांची नावे नोंदवून घेण्यात आले आहेत त्यांना रेशन मिळणार की नाही हे पुढील येणारी वेळेस सांगू शकते. मात्र सध्यातरी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी नावे नोंदवून घेऊन समाधान करण्याचे काम केले आहे.