लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सतीश जारकीहोळी फाउंडेशनने आपला सेवाभावी उपक्रम सुरूच ठेवला आहे. या फाऊंडेशनतर्फे हत्तरगी व हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावरील कर्मचारी तसेच त्या भागातील गरीब गरजूंना सोमवारी जीवनावश्यक साहित्याच्या किट्ससह भाजीपाला व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.
देशव्यापी लॉक डाऊन त्याकाळात सर्वसामान्यांसह गोरगरीबांचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत आणि त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी सतीश जारकीहोळी फाउंडेशन गेल्या महिन्याभरापासून विविध उपक्रम राबवत आहे. या अनुषंगाने सोमवारी हत्तरगी व हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावरील कर्मचारी तसेच त्या भागातील गरीब गरजूंना सोमवारी जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद, केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिगळे, रियाज चौगले आणि सुभाष व्हनमनी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते हत्तरगी व हिरेबागेवाडी टोल नाक्यांवरील प्रत्येकी 40 अशा एकूण 80 कर्मचाऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्ससह भाजीपाला व सॅनीटायझरचे वितरण केले गेले. याप्रसंगी सतीश जारकीहोळी फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.