बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे कोरोना बाधित यांची संख्या अधिक आढळल्याने संपूर्ण गाव रेड झोन’मध्ये गेले आहे. आता या ठिकाणचे रुग्ण बरे होऊ लागले आहेत तर एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या हे गाव रेड झोन असल्याने या गावात कोणतेही व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.मात्र नुकतीच या गावातील शेतकऱ्यांना आता शेती करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
हिरेबागेवाडी या गावात कोरोना बाधित अधिक आढळल्याने संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेती व्यवसाय करणे कठीण बनले होते. या वर्षीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. याचा विचार करून तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी मुभा देण्यात आली आहे.
याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांकडून जे काही सहाय्य लागेल ते करण्यासाठी आम्ही पावले उचलू असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे या परिसरातील शेती कामाने आता वेग येणार आहे. सध्या सर्वत्र धूळ पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र हिरे बागेवाडी येथे कोरोना रुग्ण अधिक आढळल्याने हे गाव लॉक डाऊन मध्ये संपूर्ण बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथील शेतकर्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
सध्या या गावातील काही रुग्ण बरे झालेले आहेत. त्याचबरोबर शेती केल्यानंतरच पोटापाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने या शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. दरम्यान आता या भागातील शेतकऱ्यांनी शेती करावी असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे सांगण्यात आले. सध्या हिरेबागेवाडी हे गाव रेडझोनमध्ये असले तरी शेती करण्यासाठी मुभा देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नुकतीच तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी भेट देऊन तेथील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.