बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आम्लन आदित्य बिश्वास यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव विजय भास्कर यांनी जारी केला आहे.एक कर्तव्यदक्ष,कडक आणि शिस्तीचे अधिकारी म्हणून आम्लन बिश्वास यांची ओळख आहे.
त्यांच्याकडे बेळगाव,कारवार आणि विजापूर या तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.हे तीन जिल्हे अन्य राज्यांना लागून असल्यामुळे तेथे लक्ष ठेवून कोरोनाचे व्यवस्थापन करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे.त्यामुळेच आम्लन यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.
या जिल्ह्यातील कोरोना बाबत सगळे व्यवस्थापन करण्याचा आणि अमलात आणण्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी बिश्वास यांच्यावर आहे.कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्याची देखील जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन नंतर परराज्यातून लोक येण्यास प्रारंभ झाला आहे.परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीमुळे समस्या उदभवणार नाही हे देखील त्यांना पाहावे लागणार आहे.प्रशासकीय कार्याचा अनुभव असल्यामुळे सद्यस्थितीत अनेक सुधारणा घडवून आणण्यात ते यशस्वी होतील.