राणी चन्नमा विद्यापीठासह इतर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर च्या शाखांच्या परीक्षा फी माफ
करावी, या आशयाचे निवेदन मराठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत
असलेल्या मराठी विद्यार्थी संघटनेतर्फे
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांना
सोमवारी (ता. ११) देण्यात आले. याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात सर्वच स्तरावरील जनतेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच विद्यापीठाने ऑनलाइन परिक्षा फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तारीख जाहीर केली आहे. ह्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर मुलांच्या परीक्षा फी चा सुद्धा प्रश्न उभ राहिला आहे.त्यामुळे ती फी माफ करण्यासाठी मराठी विद्यार्थी संघटनेकडून राज्य शिक्षण मंत्र्यांना तसेच मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी संघटनेतर्फे सिद्धार्थ चौगुले , प्रतिक पाटील, प्रवीण मराठे, आशिष कोचेरी, जोतिबा पाटील, महांतेष कोळूचे आदी उपस्थित होते.