किणये धरणांमुळे 700 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. यासाठी काही जमीन संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. या धरणामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिले आहे.
जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी नुकतीच धरणाला भेट दिली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन संबंधित अभियंत्यांना केले आहे.या धरणाचे पाणी इतर शेतकऱ्यांनी व्हावे यासाठी वाघवडे आणि बहादरवाडी परिसरात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे.
दोन कालव्यांच्या उभारणीसाठी सुमारे 78 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. याद्वारे या कामांना तातडीने सुरू करण्यात येऊन या कालव्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. कालवे सुमारे दहा किलोमीटर लांब जाणार आहेत. यासाठी 23 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बेळगाव तालुक्यात अनेक गावांना याचा लाभ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असणार असे त्यांनी सांगितले आहे.
Covid-19 मुळे अनेक कामांना स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता काही कामे सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला असून ती तातडीने पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या पावसाळ्यात धरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य अभियंत्यांना दिले.
एक कालवा वाघवडे गाव तलावाजवळील तर दुसरा कालवा बहादरवाडी गावच्या तलावाच्या भागात पोहोचेल. या भागात भूसंपादनाची प्रक्रिया झाली पाहिजे, अशी सूचना मंत्र्यांनी केली. भूसंपादनासाठी अनुदानाचा कोणताही अडथळा नाही. शेतकर्यांच्या विनंतीनुसार जिथे आवश्यक तेथे कालवे तयार करण्याची सूचनाही मंत्र्यांनी केली. बेळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश दिले. यावेळी इतर अधिकारी उपस्थित होते.