Monday, January 27, 2025

/

वटवाघळांमुळे कोरोना नव्हे, तर फायदेच जास्त – राहुल प्रभुखानोलकर

 belgaum

वटवाघळांमुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण अथवा प्रसार होत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट वटवाघळांमुळे मनुष्याला होणारे फायदेच जास्त आहेत, अशी माहिती बेळगावसह पश्चिम घाटातील वटवाघुळ संवर्धक संशोधक राहुल प्रभुखानोलकर यांनी दिली आहे.

“बेळगाव, वटवाघूळ आणि कोरोना” या विषयावर बोलताना राहुल प्रभुखानोलकर यांनी उपरोक्त माहिती दिली. चीनमधील वुहान प्रांतातून जेंव्हा कोरोना विषाणू प्रादुर्भावाला सुरुवात झाली. त्यावेळी प्रारंभी वटवाघळांना दोषी ठरविण्यात आले. कोरोनाचा मानवातील संसर्ग हा वटवाघळांमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. परंतु संशोधनाअंती हा संशय खोटा ठरला. संशोधनाअंती सिद्ध झाले आहे की वटवाघळांमुळे कोरोना संक्रमण अथवा प्रसार होत नाही. उलट वटवाघळांमुळे फायदेच खूप त्रास होतात.

RAhul khanolkar
RAhul prabhu khanolkar

शेतातील फळ झाडांवरील कीड खाण्याचे काम वटवाघळे करतात. सायंकाळी आपल्या घरांच्या आसपास छोटी – छोटी वटवाघळे हवेत उडताना दिसतात. त्यापैकी एक छोटे वटवाघुळ एका रात्रीत 400 ते 500 छोटे मच्छर खाऊन संपवत असते. या पद्धतीने आपल्याला वटवाघळांचा फायदाच होत असतो. कोरोनाचा संसर्ग अथवा प्रादुर्भाव हा वटवाघुळांमुळे नाहीतर माणसे जास्त रस्त्यावर फिरल्यामुळे आणि लॉक डाऊन न पाळल्यामुळे होत असल्याचेही राहुल प्रभुखानोलकर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

बेळगाव परिसरात 7 – 8 प्रकारची वटवाघळे आढळतात. त्याचप्रमाणे बेळगाव आणि दांडेली येथील जंगल प्रदेशांमध्ये सुमारे 30 – 35 जातींची वटवाघळे आढळून येतात. यापैकी वटवाघळांच्या 2 – 3 जाती अशा आहेत की ज्या फक्त पश्चिम घाटातच आढळून येतात. जगात अन्यत्र कोठेही या जातीची वटवाघळे आढळून येत नाहीत, अशी माहिती देऊन वटवाघळे आसपास उडत राहणे, ती जिवंत राहणे, हे फार महत्त्वाचे आहे ते जर टिकले, ते जर वाचले तर आपणही वाचू . त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच वटवाघळांचीही काळजी घ्या, असे आवाहन वटवाघुळ संवर्धक संशोधक राहुल प्रभुखानोलकर यांनी केले आहे.

राहुल प्रभुखानोलकर हे म्हादाई रिसर्च सेंटर आणि इंडियन बॅक कंझर्वेशन रिसर्च युनिटी यांच्या माध्यमातून बेळगाव आणि पश्चिम घाटात वटवाघूळ संवर्धन आणि संशोधन यावर काम करतात.वटवाघुळ कोरोना आणि बेळगाव याबाबत काय सांगतात प्रभुखानोलकर नक्की पहा खालील व्हीडिओ
#राहुलप्रभूखानोलकर
#पश्चिमघाटजंगल
#संशोधनवटवाघुळ
#बेळगावलाईव्ह
#कोरोनाआणिवटवाघूळ

राहुल प्रभुखानोलकर हे म्हादाई रिसर्च सेंटर आणि इंडियन बॅक कंझर्वेशन रिसर्च युनिटी यांच्या माध्यमातून बेळगाव आणि पश्चिम…

Posted by Belgaum Live on Thursday, April 30, 2020

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.