कर्नाटकमध्ये खासगीबस होणार आहे.उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी शुक्रवारी सांगितले की लवकरच खासगी बसगाडय़ा राज्यभर सुरू होतील.
जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाऊन विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या या सरकारी बस सेवा सुरू होत आहेत.
खास बाब म्हणजे खासगी बस ऑपरेटर त्यांचे भाडे वाढवण्याच्या विचारात आहेत. सवदी म्हणाले “खासगी वाहतूक सुरू करण्याबाबत आम्ही मालकांशी चर्चा करीत आहोत. परंतु भाड्यात 50 टक्के वाढ करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, आम्ही त्यांना बसचे भाडे 15 टक्क्यांनी वाढवण्यास सांगितले आहे.”
काही खासगी बस मालकांनी आताच 50 टक्क्यांहून अधिक भाडे घेऊन बुकिंगला सुरुवात केली आहे. मात्र आता प्रवाशांनी 15 टक्क्यांपेक्षा अधिक दर देऊ नये. यासाठी परिवहन मंत्री यांनी ही घोषणा केली आहे.