बेळगावातील इलेक्टरीकल्स आणि पेंडाल डेकोरेटर्स देखील लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात अडकले आहेत मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी ज्या प्रमाणे धोबी आणि नाभिक ऑटो चालक व विणकर समाजाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे त्या प्रमाणे इलेक्ट्रिकल आणि पेंडाल डेकोरेटर्स यांना देखील आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बेळगाव तालुका इलेक्टरीकल्स आणि पेंडाल डेकोरेटर्स असोसिएशन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांची भेट घेऊन निवेदन देत त्यांनी ही मागणी केली आहे.गेल्या तीन महिन्यात लॉक डाऊन पेंडाल डेकोरेशन सिजन नुकसान झाले आहे.सहा महिन्यांचा सीझन खाली गेला आहे.सुमारे 300 डेकोरेटर्स मालक व 7 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली
सण लग्न समारंभ कार्यक्रम धार्मिक शासकीय इतर रद्द झाले आहेत त्याचा फटका पेंडाल डेकोरेटर्स ना बसला आहे
आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी अनेकांनी कर्जे काढली आहेत बँकेचे हप्ते थकले आहेत अश्या वेळी सरकारच्या मदतीची अपेक्षा या पेंडाल डेकोरेटर्सना आहे. बिनव्याजी कर्जे द्यावीत सरकारी कार्यक्रमात पेंडाल इलेक्टरीकल डेकोरेशन साठी स्थानिक डेकोरेटर्सना प्राधान्य द्यावे.
लघु उद्योग डी ई सी योजनेत विशेष पॅकेज द्यावे तसेच या व्यवसायात राबणाऱ्या कामगारांना आर्थिक सहाय्य करा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी नारायण चौगुले, बाळू जोशी,डी सी मन्नोळकर, परशुराम सालुंके आदि उपस्थित होते.