शहरातील केस कटिंग दुकान अर्थात सलून दुकाने पुनश्च सुरू करण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही. तेंव्हा हा आदेश येईपर्यंत नाभिक (सलून व्यावसाईक) बंधुंनी आपले दुकान खुले करू नये, असे जाहीर आवाहन बेळगाव शहर, शहापूर व हिंडलगा ग्रामीण सलून व्यावसायिक संघटनेने केले आहे.
नाभिक (सलून व्यावसाईक) बंधूंना कळविण्यात येते की संपूर्ण बेळगाव शहरातील सलून दुकाने सुरु करण्याचा सरकारचा कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही. जी दुकाने चालू आहेत त्यांना 5,000 ते 12,000 रु. पर्यंत दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही अधिकृत आदेश येई पर्यंत दुकाने उगडण्याची घाई करू नये. अधिकृत आदेश आल्यानंतर अटी व नियमांचे पालन करून दुकाने चालु करावीत ही विनंती, असे जाहीर आवाहन बेळगाव शहर, शहापूर आणि हिंडलगा ग्रामीण सलून व्यावसायीक संघटनेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.