कर्नाटक सरकारने चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे.31 मे पर्यंत ही बंदी असणार आहे.बाहेरील राज्यातुन येणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोना प्रसार होत आहे.यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र,गुजरात,तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून 31 मे पर्यंत कोणालाही कर्नाटकात प्रवेश करता येणार नाही.यापूर्वी ज्या व्यक्तींनी कर्नाटकात येण्यासाठी पास घेतले आहेत त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोना फैलाव होत असल्याचे उघडकीस आले आहे.सोमवारी एका कोरोना रुग्णाचे मुंबई कनेक्शन उघड झाले आहे. यामुळे आता कर्नाटक खबरदारीचा उपाय राबवत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जास्त नागरिक येत आहेत, अनेक जण चोरीच्या मार्गाने कर्नाटकात पोहोचत असून त्यांचा संसर्ग होऊन कर्नाटकातील रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे विशेषतः महाराष्ट्रातुन कर्नाटकात येणाऱ्या विशेष लक्ष ठेवले जाणार आहे महाराष्ट्रातून येणारे लोक कर्नाटकात कोरोना घेऊन येत आहेत महाराष्ट्र रिटर्न कोरोना संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.