कोरोना निगेटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा पोजीटिव्ह झाला आहे बेळगाव जिल्हा रुग्णालय बिम्सने सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये निगेटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा पोजीटिव्ह झाल्याची माहिती दिली आहे.
पी 298 या रायबाग कुडची येथील निगेटिव्ह रुग्णांचे घश्याचे द्रव पुन्हा पोजीटिव्ह आल्याने त्याला बिम्स मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
14 एप्रिल रोजी हा रुग्ण पोजीटिव्ह आढळला होता या रुग्णाला हृदयाचा विकार होता उपचारासाठी त्याला बिम्स मध्ये दाखल करण्यात आले होते 14 एप्रिल रोजी पोजीटिव्ह झालेल्या रुग्णांचे घश्याचे नमुने 14 दिवसांनी 28 एप्रिल रोजी पुन्हा घेण्यात आले 30 एप्रिल रोजी त्याचा अहवाल मिळाला त्यात तो निगेटिव्ह आला त्यामुळे त्याला 5 मे रोजी डिस्चार्ज करून कुडची इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते.
या रुग्णांचे तिसऱ्यांदा चाचणीसाठी घश्याचे द्रव 5 मे डिस्चार्ज रोजी घेण्यात आले होते त्याचा अहवाल 5 रोजीच पुन्हा पोजीटिव्ह असा आला आहे त्यानंतर 6 मे रोजी त्याला पून्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे.
एकदा निगेटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा पोजीटिव्ह व्हायची राज्यातील पहिलीच घटना आहे निगेटिव्ह झाल्या नंतर इन्स्टिट्युशनल क्वांरंटाइन मध्ये तो आणखी कुणाच्या संपर्कात आलाय का याचा देखील तपास सुरू आहे.