Saturday, November 16, 2024

/

आंतरराज्य बंदीमुळे कारवारच्या व्यक्तीचा कराडमध्ये दफनविधी

 belgaum

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराज्य वाहतूक बंदीच नियमाच्या कडक अंमलबजावणीमुळे मूळचे कारवारचे असलेल्या आणि भरूच (गुजरात) येथे निधन पावलेल्या असिफ लतीफ सय्यद यांच्यावर नाईलाजाने कराड (महाराष्ट्र) येथे दफन विधी करावा लागल्याची घटना नुकतीच घडली.

कारवार येथून कामासाठी गुजरातमधील भरुच येथे गेलेले आसिफ लतीफ सय्यद हे पुन्हा आपल्या गावी परतलेच नाहीत. भरुच येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. परिचितांनी त्यांचा मृतदेह कारवारला नेण्यासाठी कर्नाटक सीमेवरील कोगनोळी नाक्यापर्यंत आणला होता. मात्र आंतरराज्य वाहतूक बंदीचा नियम पुढे करून त्यांचा कर्नाटकातील प्रवेश नाकारण्यात आला. तेंव्हा नाइलाजाने मृतदेह कोल्हापूर मार्गे कराडला न्यावा लागून अखेर त्या ठिकाणी मृतदेहावर दफनविधी करावा लागला. हा प्रकार पाहता आता माणसापेक्षा नियम मोठे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच “माणसापेक्षा नियम मोठे नाहीत” असे म्हणणे यापुढे बंद करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, बिकट परिस्थितीत कठोर वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा दोष नसून ते शासनासह वरिष्ठांच्या हुकुमाचे ताबेदार आहेत. नियम मोडला तर कारवाईची टांगती तलवार असल्याने त्यांचाही नाइलाज होत असतो. यासाठी प्रशासनाकडूनच प्रसंग पाहून निर्णय घेण्याची लवचिकता दाखविणे गरजेचे आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

 belgaum

2 COMMENTS

  1. Amhi adkun padloy kewa chalu karal tumhi Belgaum made entry ….dusrya state Che Sarkar as Nahi karat te aplya lokana sukhrup entry detata ani Karnataka Sarkar tr aplya lokanach ghri yenyasati bandi ghatle ……..ekdam kharab chaly

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.