रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बेळगावात सोमवारी 24 मे रोजी साजरा केला जाणार आहे बेळगाव अंजुमन या संस्थेने आणि चांद कमिटीने हा निर्णय घेतला आहे.
भारत देशात शनिवारी कुठेच चंद्र दर्शन झाले नाही त्यामुळे रमजान ईद देशासह बेळगावात देखील सोमवारी साजरी होणार आहे.बेळगाव अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ यांच्या अध्यक्षतेखाली चांद कमिटीची बैठक अंजुमन संस्थेच्या सभागृहात पार पडली त्यावेळी ईद सोमवारी साजरी करावी याबाबत चर्चा झाली.
या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनी द्वारा देशातील विविध चंद्र दर्शन झाले का याबाबत माहिती घेतली असता देशात कुठेच चंद्र दर्शन झाले नसल्याची माहिती मिळाली.त्यामुळे या कमिटीने बेळगावात सोमवारी रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला.या बैठकीत चांद कमिटी अंजुमन संस्थेचे सदस्य व मुफ्ती मौलाना उपस्थित होते.
ईद सोमवारी साजरी करा मात्र लॉक डाऊन असल्याने प्रत्येकाने ईद ची नमाज आपापल्या घरी राहून करावी कश्या पद्धतीनं ईद ची नमाज करावी याबाबत वरिष्ठ धर्मगुरू यांचा सल्ला घ्यावा असे आवाहन अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ यांनी केले आहे.