लॉक डाऊनमुळे आर्थिक समस्येत सापडलेल्या तेलगू मोची समाजाला कर्नाटक सरकारने पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.आमदार अनिल बेनके यांनी ही मदत मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
कॅम्प भागातील तेलगू मोची समाज हा चप्पल,बूट तयार करणे,दुरुस्ती करणे हा व्यवसाय करतो.
या व्यवसायावरच कॅम्पमधील शेकडो कुटुंबाचा चरितार्थ चालतो.लॉक डाऊनमुळे यांची चप्पल,बूट तयार करण्याचा आणि दुरुस्ती करण्याचा व्यवसाय बंद पडला.त्यामुळे तेलगू मोची समाज आर्थिक समस्येत अडकला होता.यासाठी तेलगू मोची समाजाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांना निवेदन दिले होते.मंत्री सुरेश अंगडी यांच्या मार्गदर्शनानुसार आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांची भेट घेऊन तेलगू मोची समाजाला मदत देण्याची मागणी केली.
उप मुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनीही तेलगू मोची समाजाला मदत द्यावी अशी मागणी केली.त्यामुळे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी तेलगू मोची समाजाला पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.समाजाला मदत मिळवून दिल्याबद्दल तेलगू मोची समाजाने आमदार अनिल बेनके यांचे आभार मानले आहेत.
बेळगावातील तेलगू समाजाने उत्तर आमदारांचे का मानले आभार? काय सांगताहेत तेलगू समाजातील पंच मंडळी पहा खालील व्हीडिओत
बेळगावातील तेलगू समाजाने उत्तर आमदारांचे का मानले आभार? काय सांगताहेत तेलगू समाजातील पंच मंडळी पहा खालील व्हीडिओत
Posted by Belgaum Live on Friday, May 29, 2020