लॉज मध्ये क्वारंटाइन असलेल्या आपल्या मुलीवर असलेल्या प्रेमापोटी भेटायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांला क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.
शुक्रवारी कोरोनाबधित 11 रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये राखीव पोलीस दलातील ए एस आय च्या मुलीचा समावेश आहे.हिरेबागेवाडीत रहाणारी ही मुलगी दुय्यम संपर्कात आल्यामुळे तिला क्वांरंटाइन करण्यात आले होते आज सकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर मुलगी ए एस आय असलेल्या वडिलांच्या संपर्कात आली होती त्यामुळे त्या ए एस आय लाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. ए एस आय ला क्वारंटाइन करण्यात आल्यामुळे बेळगाव पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे या ए एस आय च्या संपर्कात बंदोबस्त आणि अन्य कारणांमुळे इतर पोलीस आणि अधिकारी संपर्कात आले आहेत त्यामुळे आता पोलीस दलातही खळबळ माजली आहे.
या ए एस आय च्या संपर्कात असलेल्या आणि आलेल्या व्यक्ती आणि पोलिसांची माहिती गोळा करण्यात येत आहे माहिती गोळा केल्या नंतर जिल्हा प्रशासन आरोग्य आणि पोलीस खाते कोणते पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे.