Friday, January 3, 2025

/

शेवटच्या दोन ‘लॉकडाउन’ रविवारी लगीन घंटा वाजू शकते

 belgaum

ज्यांनी मेच्या शेवटच्या दोन रविवारी लगीन गाठ बांधण्याचा विचार केला होता अशा सर्वांच्या निवारणासाठी कर्नाटक सरकारने गुरुवारी आपले धोरण स्पष्ट केले. की 24 आणि 31 मे रोजी आधीच ठरलेल्या लग्नांना ‘संपूर्ण रविवार लॉकडाऊन’मधून सूट देण्यात येईल. लॉकडाउन 4 च्या नियमांचा एक भाग म्हणून रविवार बद्दल हा निर्णय घेण्यात आला होता.

या तारखांना अगोदरच ठरवून देण्यात आलेल्या लग्नांना न थांबविता पुढे जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणार्‍या जनतेच्या विनंतीवरून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

लॉकडाउन निर्बंधाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करताना मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सोमवारी सांगितले की, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत कर्फ्यू सुरू राहणार असून रविवारी संपूर्ण लॉकडाउन असेल.

‘रविवार बंद’ ने सार्वजनिक विवाह, दुकाने आणि आस्थापने आणि अगदी लोकांच्या हालचालींवर कडक निर्बंध घातल्यामुळे विवाहसोहळा पार पाडणे अशक्य झाले असते.मात्र आधीच ठरलेल्या सोहळ्यांना दिलासा मिळाला आहे.

सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळल्यास मे च्या शेवटच्या दोन रविवारी लग्नास परवानगी देऊ शकतात.50 हून अधिक पाहुणे नाही, एसी नाही, मद्य आणि पानांचे सेवन नाही, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या किंवा दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना किंवा गर्भवतींना आमंत्रण नसेल अशी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.