कर्तव्य बजावताना शॉर्ट सर्किटमुळे शॉक लागल्याने हेस्कॉमच्या लाईनमन युवकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील अलारवाड गावात घडली आहे.शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून राचय्या केरीमठ असे या घटनेत मयत झालेल्या लाईनमन युवकाचे नाव आहे.
अलारवाड येथील आश्रय कॉलनी मध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी तो आला होता त्यावेळी शॉक लागल्याने तो घटनास्थळीच मयत झाला होता.याबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी तो स्वतः होऊन अलारवाड ला जाऊन फिरून येतो म्हणून गेला होता.
लाईनमन राचय्या दोन महिन्यांपूर्वी नोकरीत कायमस्वरूपी म्हणून नियुक्त झाला होता मात्र अजून ऑर्डर देखील मिळाली नव्हती त्याचे आई वडील देखील नव्हते त्याच्या पश्चात्य चार बहिणी आहेत. मयत लाईनमन च्या कुटुंबियांना मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.