महालक्ष्मी संचलित लैला शुगर प्रा. लि. खानापूरने शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2019 नंतर पुरवठा केलेल्या सर्व उसाची बिले आणि वाहतूक बीले त्वरित अदा करावीत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हे सदर मागणीचे निवेदन नुकतेच महालक्ष्मी संचलित लैला शुगर प्रा. लि. खानापूर या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक आणि उपाध्यक्षाना सादर करण्यात आले. महालक्ष्मी संचलित लैला शुगर प्रा. लि.ने 31 डिसेंबर 2019 पर्यंतचे ऊस बिलाचे हप्ते दिलेले आहेत. मात्र 22 मार्चपासून सुरू झालेल्या लाॅक डाऊन आणि कोरोना प्रादुर्भावामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
खत विकत घेणे, नव्याने पिकाची मशागत करणे देखील त्यांच्यासाठी महाकठीण झाले आहे. तरी 31 डिसेंबर 2019 नंतर कारखान्याला गेलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व उसाची व वाहतुकीची बिले त्वरित अदा केली जावीत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील व कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.