कांही विघ्नसंतोषी लोकांनी चक्क गटारांमध्ये कपडे टाकून ड्रेनेजचे पाणी जाणून-बुजून अडविण्याचा संतापजनक प्रकार नुकताच मंडोळी रोडवरील दत्त मंदिरासमोर उघडकीस आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून महानगरपालिकेने तातडीने येथे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत पैदा रेल्वे गेट पासून मंडळीच्या दिशेने जाणारा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटारी ही बांधण्यात आल्या आहेत. तथापि श्री दत्त मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या हॅक्सीन डेपो क्रॉस येथील ड्रेनेजचे मेन होलच्या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाणी तुंबण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे नजीकच्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ड्रेनेजचे सदर मेन हॉल हे या ठिकाणच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठीचे मध्यवर्ती एक केंद्र आहे. या ठिकाणी व्हॅक्सिन डेपो मैदानाच्या बाजूला असणाऱ्या वसाहतींमधील सांडपाणी मोठ्या प्रमाणात येत असते. यात भर म्हणून मंडळीच्या दिशेने जाणारा येथील रस्त्याच्या डाव्या बाजूचे गटार स्थानिकांच्या आक्षेपांमुळे अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी व्हॅक्सिन डेपोनजीक कुलकर्णी कंपाऊंड शेजारी ड्रेनेज इथे सांडपाणी कंपन्यांचा प्रकार सातत्याने घडत असतो.
अलिकडेच कांही दिवसापूर्वी श्रीदत्त मंदिराशेजारी खालच्या बाजूला असलेल्या कांही विघ्नसंतोषी लोकांनी आपल्यापर्यंत ड्रेनेजचे सांडपाणी येऊ नये यासाठी चक्क गटारीमध्ये कपडे टाकून सांडपाणी तुंबविण्याचा निंद्य प्रकार केला. यामुळे आसपासच्या नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. या प्रभागाचे नगरसेवक संबंधित ड्रेनेज तुंबण्याच्या या प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तरी महापालिकेच्या तसेच स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.