बेळगाव गोवा या राज्यमहामार्ग जोडणाऱ्या कुसळी जवळील मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक झाल्याने बेळगाव गोवा अशी वाहतूक काल 27 मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून बंद झाली होती.
ब्रिटिशकालीन मलप्रभा नदीवर कुसळी जवळ असलेल्या ब्रिजला शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे या पुलावर अनेक अपघात झालेले असून बेळगाव व गोव्याला जोडणारा तसेच जांबोटी कमी भागाला जोडणारा हा महत्त्वाचा फुल आहे. या फुलावरून गोव्याहून बेळगावकडे जाताना हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली.
हा पूल अरुंद असताना देखील दोन्ही वाहनचालकांनी न थांबता गाड्या पार करण्यासाठी प्रयत्न केला यावेळी ब्रिजवर दोन्ही गाड्यांची धडक झाल्याने दोन्ही गाड्या कठड्यांला धडकल्या. यात लोखंडी साहित्य घेऊन जाणारा ट्रक सुदैवाने ब्रीजवरुन कोसळताना वाचला. एकंदरीत दोन्ही वाहनचालकांना ब्रिज पार करण्याची घाई झाली होती हे अपघातावरून दिसते. ब्रिजवरील दोन्ही कठड्यांमुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे बेळगाव गोवा अशी वाहतूक संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत टप्प झाली होती.
या अपघातात ट्रक चे तसेच पुलाच्या कठड्याचे मोठे नुकसान झाले आहे. असून अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या पुलाची रुंदी 5 मीटर पेक्षा कमी असल्याने या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे.हा महामार्ग नव्याने बांधण्यात आल्यापासून बेळगाव ते गोवा हे अंतर प्रवासासाठी कमी झाले असले तरी अपघाताच्या प्रमाणत मोठ्याने वाढ झाली आहे. अरुंद रस्ते, नागमोडी वळणे तसेच अतिवेग यामुळे अपघातात वाढ झाली आहे.