दुसऱ्या टप्प्यातील देशव्यापी लॉक डाऊनची समाप्ती 3 मे रोजी झाल्यानंतर सोमवार दि 4 मे 2020 पासून जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन असलेले तीन तालुके वगळता अन्य भागातील दुकाने आणि दैनंदिन व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सशर्त अनुमती असल्याचे जिल्हा पालक मंत्री जगदीश शेट्टर यांनी शनिवारी जाहीर केले. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हा हा रेड झोनमध्ये नसून “ऑरेंज झोन”मध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.बेळगावात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
बेळगाव शहरात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर पुढे म्हणाले की, राज्यात बेळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे या झोनशी संबंधित सर्व नियम लागू असण्याबरोबरच सर्व सुविधा जनतेला उपलब्ध असतील. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातून आपली मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली आहे. या चर्चेअंती लॉक डाऊनच्या समाप्तीनंतर 4 मे बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यातील कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागातील दुकाने सकाळी 7 ते ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सशर्त अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत कोणताही पास वगैरे वापरण्याची गरज नाही. व्यावसायिकांप्रमाणे उद्योजकांना देखील आपापले उद्योग सशर्त सुरू करण्यास परवानगी असणार आहे. फक्त यासाठी उद्योजकांना सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागणार आहे. तथापि या सर्व बाबतीत केंद्र सरकारची नवी मार्गदर्शक सूची हाती आल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.तीन तालुका वगळता जिल्ह्यातील दुकाने खुली ठेवण्यास 4 मे पासून दिवसभर परवानगी असली तरी सायंकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत लोकांना घराबाहेर पडता येणार नाही, असेही पालकमंत्री शेट्टर यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 37 कोरोना बाधित रुग्ण हिरेबागेवाडी येथे सापडले आहेत. हिरेबागेवाडीची लोकसंख्या सुमारे 16 हजार असून येथील 700 स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत जी वाढ होत आहे ती प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्टमुळे होत असल्याची माहिती दिव्या पालकमंत्र्यांनी दिली.
Your news is very good news