पर राज्यातून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कर्नाटकातील त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी द्यावी संबंधित जिल्ह्याच्या नोडल ऑफिसरला या संबंधीची माहिती देणे आवश्यक आहे.शेजारच्या राज्यातुन आलेल्या व्यक्तींना होम किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करावे लागणार आहे यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन पर राज्यातून कर्नाटकातील दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या व्यक्तींना योग्य ती काळजीपूर्वक आरोग्य तपासणी करूनच पाठवावे अश्या सूचना पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी अधिकारी
आणि लोकप्रतिनिधिंच्या बैठकीत दिली.
पर राज्यात मृत झालेल्या व्यक्तीवर तेथेच अंत्य संस्कार करावे त्यांचा मृतदेह कर्नाटकात आणू नये अशी सूचनाही मुख्य सचिवांना करण्यात आल्याची माहिती शेट्टर यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना पीडित रुग्णांची संख्या वाढली असली तरी आज पर्यंत केवळ एक व्यक्ती मृत झाली असून त्यातील 38 जण बरे झाले आहेत.कंटेंमेट झोन असलेल्या ठिकाणी नागरिकांना घरपोच सगळ्या वस्तू पोच करण्यासंबंधीही नियोजन सुरू आहे.जिल्हा रुग्णालयात कोरोना बधितांवर उपचार चांगल्या पद्धतीनी केले जात आहेत. असे प्रशंसोदगार देखील शेट्टर यांनी काढले.
उद्योगधंदे कारखाने या विषयी जिल्हाधिकाऱ्या कडून पालकमंत्र्यांनी माहिती घेतली.हेस्कॉमने विजेचे बिल एकदम दोन महिन्याचे पाठवले आहे दोन महिन्याचे बिल एकाच वेळी भरणे सगळ्यांना शक्य नाही यामुळे त्यांना मुदत देण्यात यावी असेही शेट्टर म्हणाले.या बैठकीतूनच हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून बिल वसुली बाबत वेळ देण्याची सूचना केली.बैठकीला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी खासदार प्रभाकर कोरे मंत्री शशिकला जोले, आमदार आदी उपस्थित होते.