सिमरन दिवटे ही अतिशय गरीब कुटुंबातील युवती सध्या हाॅजकिन लिम्फोमा (एचएल) या दुर्धर कर्करोगाशी लढा देत आहे. सिमरन हिच्यावरील तातडीच्या उपचारासाठी 10 लाख रुपयांची गरज असून त्यासाठी आपल्याला आर्थिक सहाय्य करावे, असे जाहीर आवाहन सिमरनची आई कला शंकर दिवटे यांनी केले आहे.
20 वर्षीय सिमरन दिवटे ही मूळची कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी असून तिला विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशीपासून उद्भवणारा हाॅजकिन लिम्फोमा हा कर्करोग (कॅन्सर) झाला आहे. घरची परिस्थिती गरिबीची असलेल्या सिमरनला फक्त तिच्या आईचा आधार आहे. गेल्या वर्षभरात सिमरनवरील उपचारासाठी तिची आई कला दिवटे यांनी आपली सर्व कमाई खर्च केली आहे.
सिमरन हिच्यावर सध्या बेळगावचे डॉ. अभिनंदन हंजी उपचार करत आहेत. आता तिच्यावरील केमोथेरपीसह तातडीच्या नव्या उपचारासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च येणार आहे. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कला दिवटे यांना हा खर्च न पेलणारा आहे. यासाठी त्यांनी दानशूर व्यक्ती व संघ संस्थांकडे आर्थिक मदतीचा हात मागितला आहे.
इच्छुकांनी कृपया पुढील बँक अकाउंटवर आपली आर्थिक मदत जमा करावी, असे आवाहनही कला दिवटे यांनी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, सेव्हिंग अकाउंट नंबर – 20285596472, आयएफएससी – एसबीआयएन 0000282, नांव – कला शंकर दिवटे, संपर्क क्र. – +91 9075417965.