खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून शेतकऱ्यांना बी – बियाणे , खते कमी पडू नयेत यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे. मागील दोन वर्षे दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत अडकला आहे. पावसाळा आता तोंडावर आलेला आहे. यामुळे शेतकरी यावर्षी तरी चांगले पीक मिळेल या आशेने पेरणीसाठी तयारी करत आहेत.यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या बि बियाणे,खत याची कमतरता पडू नये याची खबरदारी कृषी खात्याने घेणे आवश्यक आहे.
बँका व कृषीपत्तीन संस्थानी शेतकऱ्यांना कर्जे वाटप करावीत. यामुळे शेतकऱ्याला बी – बियाणे व खते खरेदीसाठी अडचण येणार नाही. तेव्हा सर्व बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्जे दिल्यास शेतकऱ्यांच्या पेरणीचा मार्ग सोपा होणार आहे.
कोरोना महामारीमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. बियाणे व खताचा जेवढी आवश्यकता आहे तेवढा साठा करण्यात करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
गेल्यावर्षी निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हा अनुभव ध्यानात घेऊन कृषी खात्याने अनेक दुकानदारावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळी तरी योग्य व चांगल्या प्रतीचे बियाणे देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेती कामाला सुरुवात झाली आहे. आणखी काही दिवसात शेतीकामाना वेग येणार आहे. याची दक्षता घेवून कृषी खात्याने कामाला लागणे गरजचे असल्याचे मत व्यक्त करण्यता येत आहे.