जॉर्ज कुरणे हा बेळगावचा “अनसंग हीरो” अर्थात ध्येयवादी नायक आयर्लंडच्या डब्लिन येथील बेऊमाॅन्ट हॉस्पिटल, बेऊमाॅन्ट येथे परिचारक म्हणून सेवा बजावत आहे. सध्याच्या संकटकालीन परिस्थितीत आम्हा सर्वांना घरी राहण्यास सांगितले जात असले तरी आमच्या सुरक्षतेसाठी कांही अनसंग हिरोज घराबाहेर आहेत. आपले कुटुंब व जिवलगांपासून दूर असणारी ही मंडळी संसर्गाचा धोका असतानाही स्वतःच्या जीवाची बाजी लावून आम्हाला वाचवण्यासाठी धडपडत आहेत. पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, अग्निशामक दल जवान, वैद्यकीय कर्मचारी, बँक कर्मचारी हे सध्याचे नवे “ग्लोबल सेलिब्रेटीज” असून जे कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये आघाडीच्या फळीतील अनसंग हिरोज आहेत.
या अनसंग हिरोज पैकी एक आहे बेळगावचा जॉर्ज कुरणे, जो आयर्लंड देशात कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी आहे. आयर्लंडच्या डब्लिन येथील बेऊमाॅन्ट हॉस्पिटलमध्ये परिचारक (नर्स) म्हणून सेवा बजावत असलेल्या जॉर्जची पत्नी आणि दोन मुलांसह संपूर्ण कुटुंब बेळगावात आहे. अलीकडेच बेऊमाॅन्ट हॉस्पिटलमध्ये अलीकडेच मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले होते. यावेळी या हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी पीपीटी किटच्या फेस शेडवर स्वतःच्या चेहऱ्याचे प्रिंटाऊट लावले होते.
पीपीटी कीट घालणे म्हणजे चेहऱ्यापासून आपले संपूर्ण शरीर नखशिकांत झाकून घेणे. यामुळे अर्थातच मास्क मागे आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोण आहे हे रुग्णांना दिसू शकत नाही. परिणामी त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरून मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो मात्र पीपीटी किटवरील प्रिंटरच्या स्वरूपातील चेहरा पाहून रुग्णांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकून त्यांचे मनोबल उंचावते.
सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने जॉर्ज कुरणे याला आयसोलेशनमध्ये रहावे लागले आहे. तथापि सुदैवाने त्याच्या दोन्ही कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. परदेशात कोरोना विरुद्ध लढा देणारे जॉर्ज कुरणे सारखे आपल्या शहरातील “अनसंग हिरोज” हे बेळगावचे शान आहेत. हे सर्वजण आपला जीव धोक्यात घालून मानवतेसाठी जे कार्य करत आहेत ते चिरस्मरणीय आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.
सौजन्य: माया मूतगेकर यांच्या फेसबुक वॉल वरून घेत भाषांतर केलेली बातमी आहे.