संपूर्ण देश कोरोना महामारी गुरफटला असून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी झटत आहे. काही ठिकाणी अनेक कारखाने बंद पडले आहेत तर या परिस्थितीत लोकडाऊन मधील चौथ्या टप्प्यात अनेकांची लूटही झाली आहे. आता अशीच लूट किणये भागात गॅस वितरकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातील ग्राहकांनी केली आहे.
या भागात एचपी गॅसचा दर एका सिलेंडरला 587 रुपये आहे तर संबंधित वितरक 610 रुपये घेऊन ग्राहकांची तेवीस रुपये प्रति सिलेंडरला लूट करत आहेत. याची तक्रार केल्यास उलट ग्राहकांना धमकी दाखवण्यात येत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर अशीच लूट सुरू राहिल्यास गॅस घ्यावी की नाही असा प्रश्न ग्राहकांसमोर पडला आहे.
या अगोदर आठवडा भरापूर्वी 710 रुपये घेतले होते गॅस एजन्सी मनमानी चालूच आहे यावर नियंत्रण आणा अशी मागणी केली जात आहे.
या भागातील विविध गॅस वितरकांकडून अशा प्रकारची लूट वारंवार होत आहे. याआधीही अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित गॅस एजन्सीकडून अशा प्रकारची लूट थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
मात्र तब्बल तेवीस रुपयांची लूट एका गॅस मागे होत असेल तर वितरक किती पैसा कमवत असेल असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील वितरकांना समज द्यावी अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशाराही संबंधित ग्राहकांनी दिला आहे.