व्यापार्यांकडून आणि ग्राहकांकडून कोरोना व लॉक डाऊन संदर्भातील नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले जात नसल्यामुळे गांधिनगर येथील फळांचे मार्केट येत्या दि. 17 मे 2020पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश सोमवारी देण्यात आला आहे. ज्यांना फळांची विक्री करायचीच असेल तर त्यांनी ती घरपोच करावी, मात्र दुकाने उघडू नयेत असेही व्यापाऱ्यांना बजावण्यात आले आहे.
शहरासह बेळगाव जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने कांही दिवसापूर्वी रविवार पेठ ही शहराची मुख्य होलसेल बाजारपेठ बंद करण्यात आल्यानंतर आता गांधीनगर येथील फळांचे मार्केट आज शनिवारपासून येत्या 17 मेपर्यंत बंद ठवण्याचा आदेश देण्यात आला आहे. एपीएमसी मार्केट प्रमाणे शहरातील गांधिनगर फळ मार्केटमध्ये प्रशासनाच्या सर्व नियमांना हरताळ फासून गर्दी होत होती. याची गंभीर दखल घेऊन शनिवारी सकाळी पोलिस अधिकाऱ्यांनी या फळ मार्केटला भेट दिली.
त्याप्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांकडून तेथील व्यापाऱ्यांना कोरोना संदर्भातील खबरदारीच्या सूचनांची माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे फळ मार्केटमध्ये कशाप्रकारे या सूचना आणि नियमांचे उल्लंघन केले जात आहे हे निदर्शनास आणून देण्यात आले. यासाठीच सदर मार्केट 17 मेपर्यंत बंद ठेवावे लागत असल्याचे सांगण्यात आले. ज्यांना फळांची विक्री करायची आहे त्यांनी ती घरपोच करावी, पण कोणत्याही परिस्थितीत मार्केटमधील दुकाने खुली करू नयेत, असा आदेश यावेळी देण्यात आला. त्याच प्रमाणे याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.