तब्बल दोन महिन्यानंतर बेळगावच्या ऐतिहासिक सांबरा विमानतळावर आज सकाळी 8 – 8.15 च्या सुमारास बेंगळूरहुन निघालेल्या पहिल्या विमानाचे आगमन झाले. बेळगाव येथे प्रवासी सोडून हे विमान पुढे अहमदाबादला प्रयाण झाले
कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील विमान सेवा गेले सुमारे दोन महिने बंद होती. बेळगाव विमानतळ ही त्याला अपवाद नव्हते. तथापि आज पासून बेळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्या असून आज सकाळी बेंगलोरहून स्टार एअरलाइन्सच्या पहिल्या विमानाचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले. या विमानातून आठ प्रवासी बेळगावला आले आहेत. विमानातून बाहेर पडतात या प्रवाशांची नियमानुसार थर्मल स्क्रिनिंग वगैरे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या प्रवासी साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आणि त्यानंतरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात आला. बेळगाव विमानतळावरील पहिल्या विमानाच्या आगमनाप्रसंगी बेळगाव जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याचे आणि महापालिकेचे अधिकारी विमानतळावर उपस्थित होते. त्यांनी विमानतळावर तैनात असलेल्या वैद्यकीय पथक आणि बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना आवश्यक त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
बेळगाव विमानतळावरून सोमवारपासून बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, इंदोर आणि म्हैसूर या ठिकाणी पांचही एअरलाईन्सची विमानसेवा सुरू होणार होती. परंतु यापैकी कांही सेवा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत. विमान सेवा पूर्ववत सुरू झाली असली तरी कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन बेळगाव विमानतळावर आवश्यक ते क्रम घेऊन विमानतळ जय्यत तयार ठेवण्यात आले आहे. यासाठी सुरक्षेच्या बाबतीत कांही निकष अनिवार्य असून ते पुढील प्रमाणे आहेत. राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांना कोणतेही काॅरन्टाईन नसेल. इंदोर, अहमदाबाद या आंतरराज्य प्रवाशांसाठी इन्स्टिट्यूश्नल आणि होम काॅरन्टाईन असेल. हैदराबाद मार्गावरील प्रवाशांचे होम काॅरन्टाईन केले जाईल. म्हैसूर, बेंगलोर मार्गावरील प्रवाशांना काॅरन्टाईन नसेल. काॅरन्टाईन पथक विमान आगमनाच्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहे.
दरम्यान, विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगसमोर सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. प्रस्थान करणाऱ्या प्रवाश्यांचे स्क्रिनिंग होत आहे. तर रन वे च्या बाजूला टर्मिनल बिल्डींगच्या मागे आगमन करणाऱ्या प्रवाश्यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासनाचे अधिकारी विमानतळावर हजर झाले आहेत. मनपा आयुक्त के एच जगदीश, प्रांत अधिकारी मनपा आरोग्य अधिकारी देखील हजर होते.
बेळगावहुन पाच ठिकाणी विमान सेवा होणार आहे. बेळगाव विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांच्यासह विमानतळ अधिकारी देखील सज्ज झाले आहेत.
राजेशकुमार मौर्य यांनी “बेळगाव लाईव्ह”शी सोबत बोलताना ही विमानसेवा आता योग्य ती काळजी घेऊन कायम राहणार आहे. आज बेंगळूर व्यतिरिक्त इतर विमानसेवा रद्द झाल्या आहेत. मात्र सध्या बेंगळूरचे विमान दाखल झाले आहे. प्रवाशांना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी थर्मल स्क्रीनींग सारख्या उपाययोजना राबविल्या जात असल्याचे सांगितले.
विमानतळ टर्मिनल इमारतींची कोणत्याही खाजगी वाहनांना परवानगी नसेल. सर्व वाहने पार्किंगच्या जागेत थांबवावी लागतील. विमानतळ इमारतीत सामाजिक अंतराचा नियम पाळून प्रवाशांसाठी आसन व्यवस्था तसेच प्रवाशांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग, आरोग्य सेतू अॅप तपासणी, प्रवासी साहित्याचे निर्जंतुकीकरण, हाताचे सॅनिटायझेशन या प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रवासी आपले तिकिट आणि ओळखपत्रासह प्रस्थान अथवा आगमन करतील. यावेळी प्रवाशांना जमिनीवरील मार्गदर्शकानुसार (फ्लॉवर मार्किंग) ये – जा करावी लागणार आहे.
दोन महिन्यांनी बेळगाव विमान तळावर सुरू झाली विमान सेवा-स्टार एअरचे बेळगाव बंगळुरू विमान विमान दाखल- आज तीन विमान होणार टेक off
दोन महिन्यांनी बेळगाव विमान तळावर सुरू झाली विमान सेवा-स्टार एअरचे बेळगाव बंगळुरू विमान विमान दाखल-पहिल्या दिवशी बंगळुरू अहमदाबाद आणि हैदराबाद सेवा-तीन ठिकाणी विमान होणार टेक off-
Posted by Belgaum Live on Sunday, May 24, 2020
आपण जी माहिती देत आहात ती फार उपयुक्त अशी आहे
पुणे बेळगांव विमान सेवा केव्हा सुरू होणार याबद्धल कळवावे जेणेकरून पर राज्यात अडकलेल्या ला मदत होईल, खासकरून मुलींसाठी