Friday, December 27, 2024

/

बोअरला पाणी लागले नाही म्हणून शेतकऱ्याची बोअरमध्ये उडी मारून आत्महत्या

 belgaum

पाचशे फूट बोअर मारून देखील पाणी लागले नसल्याने एका शेतकऱ्याने नैराश्येतून त्या बोअरवेलमध्ये उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.दरम्यान शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी दिली आहे.

लककप्पा दोडमनी असे त्या शेतकऱ्याचे नाव असून रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावात ही घटना घडली आहे.सकाळी दहाच्या सुमाराला शेतकऱ्याने अंगावरील कपडे काढून कोणाला समजायच्या अगोदरच पाचशे फूट खोल बोअरवेलमध्ये उडी मारली.

Raybag incident
Raybag incident sp dc visits

उडी मारल्यावर तो तळापर्यंत न जाता मधेच अडकून पडला आहे.ही घटना समजल्यावर रायबाग तहसीलदार चंद्रकांत बजंत्री,डी एस पी गिरीश यांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी आणि एसीपी लक्ष्मण निंबरगी देखील घटनास्थळी गेले आहेत.

राज्य आपत्कालीन मदत पथक देखील तेथे दाखल झाले असून शेतकरी अडकलेल्या बोअरवेलच्या बाजूने तीन जेसीबीच्या साहाय्याने माती काढून अडकलेल्या शेतकऱ्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत.शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू आहे की आत्महत्या याचा तपास केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.