एक कोरोना रुग्णासाठी लागतात 3.48 लाख
कोरोना व्हायरस वर उपचार करणे अतिशय महागडे ठरत आहे. कर्नाटक सरकारने बेंगळूर येथील रुग्णांवरील उपचारांसाठी 5 कोटी रुपये खर्च केले आहेत. एक रुग्णासाठी सर्वसाधारणपणे 3.48 लाखरूपये याप्रमाणे बेंगळूर मध्ये 136 जणांवर उपचार करण्यात आले आहेत.
कोविड प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांनी ही माहिती दिली. 89 लाखाची आरोग्य साधने खरेदी करावी लागली आहेत आणि कोविड वॉर्ड तयार करण्यासाठी 60 लाख खर्च आला आहे.
हे आकडे फक्त बेंगळूर मेडिकल कॉलेज पुरते मर्यादित आहेत. इतर इस्पितळात तसेच संपूर्ण राज्यात यापेक्षा अधिक खर्च केला जात आहे.
बेळगाव जिल्ह्यात देखील 85 कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आहेत बिम्स इस्पितळात एक स्पेशल आयसोलेशन वार्ड तयार करून कोरोनवर उपचार केले जात आहेत.बेळगावातील येथील रुग्णांवर किती पैसे खर्च होताहेत याची माहिती अध्याप उपलब्ध झाली नाही.