दहावीची परीक्षा घेण्यासाठी दहावी शिक्षण मंडळाने तयारी सुरू केली असून तीन मे नंतर केंद्र सरकारचे शिथिलतेचे धोरण लक्षात घेऊन शिक्षण मंत्री सुरेशकुमार हे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
कोरोना बाबत सावधगिरीचा उपाय म्हणून परीक्षेसाठी सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना मास्क घालून येणे बंधनकारक आहे.जे विद्यार्थी मास्क न घालता परीक्षा केंद्राला येतील त्यांना परीक्षा केंद्रावर मास्क देण्यासंबंधी चर्चा सुरू आहे.परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर देण्यात येणार असून त्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे.
बससेवा सुरू झाल्यावरच परीक्षा घेण्यात येणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही.सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी अधिक वर्गांची व्यवस्था परीक्षा मंडळाला करावी लागणार आहे.यासाठी परीक्षा केंद्रातील अधिक खोल्या घेण्या बरोबरच परीक्षा केंद्रांची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याचे दहावी परीक्षा मंडळाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
Ok