कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी राज्यातील जिल्हा न्यायालये सहा जून पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे.
या संबंधीचा आदेश रजिस्ट्रार जनरल राजेंद्र बदामीकर यांनी जाहीर केला आहे.जिल्ह्यातील न्यायालये,कौटुंबिक न्यायालये,कामगार न्यायालये आणि औद्योगिक लवाद हे सहा जून पर्यंत बंद राहणार आहेत.
न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी व्यक्तींच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा आहे. लॉक डाऊन मुळे ठप्प झालेले न्यायालयीन व्यवहार आणि न्यायिक कामकाज नेमके केंव्हा सुरू होणार याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत, याबद्दल अधिकृत आदेश आल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि या प्रक्रियेत सहभागी व्यक्तींना अधिकृत माहिती मिळू शकली आहे.