मजूर,कामगार आणि गरीब कुटुंबाना तीन महिने भाडे देण्यासाठी जबरदस्ती करू नये तसेच कर्जाची परतफेड करण्यास जबरदस्ती करू नये अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.एस. बी.बोमनहळ्ळी यांनी केली आहे.
लॉक डाऊनमुळे मजूर आणि कामगारवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.त्यांना रोजगार नाही.त्यामुळे त्यांना भाडे देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्यावी.भाडे देण्यासाठी मुदत दिली नाही आणि भाडे वसुलीसाठी बळजबरी केली तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक समस्येला तोंड देत आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत कर्जफेडीसाठी बळजबरी करू नये आणि दबाव आणू नये.
लॉक डाऊनमुळे अनेक मजूर,कामगार यांना आपला रोजगार,नोकरी गमवावा लागलाय.मजूर,कामगार ,छोटे व्यावसायिक आणि शेतकरी यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत कर्ज वसुलीसाठी कोणीही दबाव आणू नये किंवा बळजबरी करू नये.कर्जवसुलीसाठी बळजबरी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.