लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बेळगाव जिल्हा भगव्या पट्ट्यात सामील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली.
लॉक डाऊन फेज थ्री च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शनानुसार बेळगाव जिल्ह्याचा भगव्या पट्ट्यात(orange zone) ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचिनुसार लॉक डाऊनची अंमल बजावणी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारची मार्गदर्शक सूची 4 मे पासून लागू होणार असून दोन आठवडे चालणार आहे. भगव्या पट्ट्यात मोडणाऱ्या नियमावलीनुसार आर्थिक औद्योगिक कामे करण्यास व प्रवास करण्यास संधी दिली जाईल असे त्यांनी नमूद केलंय