एक ३४ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह महिलेनं एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्या मुलीला आता आईपासून दूर करून पावडरचे दूध दिले जात आहे. बंगळूर येथील पादरायनपुर येथे वाणी विलास इस्पितळात तिने हा जन्म दिला. कोरोना झाला पण याचवेळी ती गरोदरही होती अशावेळी त्या बाळाला सुरक्षितपणे या जगात आणणे गरजेचे होते.
इस्पितळाच्या डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारले.३ किलो वजनाच्या त्या नवजात बालिकेला कोरोनाग्रस्त मातेच्या उदरातून लवकरात लवकर बाहेर काढण्यात आले. मात्र जन्मताच तिला आईचे पहिले दूध पाजवता आले नाही.यामुळे पावडरचे दूध देण्यात आले आहे.
त्या बाळाचे स्वाब चे नमुनेही घेऊन डॉक्टरांनी चाचणीसाठी पाठवले आहेत.सुरक्षेच्या दृष्टीतून हा निर्णय घेण्यात आला आहे. बाळाच्या आईला व्हिक्टोरिया हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान शनिवारी सकाळीच्या बुलेटिन मध्ये राज्यात नवीन 36 कोरोना पोजीटिव्ह रुग्ण वाढले असून त्यांची संख्या 789 झालो आहे. कर्नाटकात देखील दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.