कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि 20 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 67 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1,462 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात मात्र सलग दुसऱ्या दिवशी एकही कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला नसल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने जाहीर केलेल्या करुणा प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 19 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून बुधवार दि. 20 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 67 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,462 इतकी वाढली असून मृतांची एकूण संख्या 41 झाली आहे मंगळवार सायंकाळपासून 13 जण पूर्णपणे कोरोना मुक्त झाले असून आतापर्यंत 556 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक रुग्ण हासन जिल्ह्यामध्ये (21) आढळून आले आहेत. त्याखालोखाल बिदर (10 रुग्ण), मंड्या (8), कलबुर्गी (7), उडपी (6), बेंगलोर शहर, तुमकुर व रायचूर (प्रत्येकी 4) आणि कारवार मंगळूर व यादगीर (प्रत्येकी 1) या जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.
आतापर्यंत राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक रुग्ण बेंगलोर (250) येथील आहेत. अन्य जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंड्या -168, कलबुर्गी -134, बेळगाव -116, दावणगिरी -112, म्हैसूर -89, बागलकोट -76, बिदर -67, विजयपुरा -60, कारवार -56, हासन -53, मंगळूर -48, धारवाड -26, चिकबळ्ळापूर -24, शिमोगा -24, उडपी -21, बेळ्ळारी -19, गदग -18, तुमकूर -15, यादगीर -13, रायचूर -11, चित्रदुर्ग -10, कोलार -9, बेंगलोर ग्रामीण -6, चिकमंगळूर -5, हावेरी -3, कोप्पळ -3, कोडगु -2.