बेळगाव मुख्य पोस्ट ऑफिस येथे कोरोना संदर्भातील नियम आणि आदेशाचे खुलेआम उल्लंघन केले जात असल्याची तक्रार भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाकडे करण्यात आली आहे.
बेळगाव मुख्य पोस्ट ऑफिस येथे कोरोना संदर्भातील नियम आणि आदेशाचे खुलेआम उल्लंघन केले जात असल्याची ही तक्रार गुरुदत्त उमाजी पाटील यांनी केली आहे सदर कार्यालयात कोणतीही तपासणी न करता नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.
या पोस्ट ऑफिसमध्ये फक्त दोन काउंटर आहेत. त्यामुळे या काउंटरवर सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन करून लोक गर्दी करत आहेत. यासाठी या ठिकाणी जादा काउंटरची सोय करावी. तसेच कोरोना संदर्भात येथील प्रवेशद्वारावर नागरिकांची तपासणी केली जात नसल्याने यासंदर्भात कडक कारवाई करावी, अशी मागणीही गुरुदत्त पाटील यांनी आपल्या तक्रारीद्वारे केली आहे.