देशात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे देशभरातील सर्व मंदिर, मशीद व चर्च ही सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकातील मंदिर, मशीद व चर्च खुली करण्यात येत असल्याचे आज बुधवारी सकाळी जाहीर करून सर्वांना धक्का दिला होता. तथापि अवघ्या काही तासांमध्ये कल्टी मारत त्यांनी आपला निर्णय बदलला असून सर्व मंदिर, मशीद व चर्च बंदच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे देशभरातील सर्व मंदिर मशिद चर्च आदी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद आहेत असे असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी धाडसी निर्णय घेत आज बुधवारपासून मंदिर मशीद आणि चर्च जनतेसाठी खुली करण्यात येत असल्याची घोषणा सकाळी केली होती.
तथापि कांही तासातच त्यांनी आपला हा निर्णय बदलला असून राज्यातील सर्व मंदिर, मशीद व चर्च सार्वजनिकांसाठी खुली केली जाणार नाहीत, असे सांगितले आहे. यासंदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची वाट पहात आहोत, अशी मखलाशीही मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केली आहे.