हेस्कॉमने लॉक डाऊन काळात लागू केलेली वाढीव बिले माफ करावीत अशी मागणी युवा समितीने केली आहे.मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने वाढीव विजबिलाच्या विरोधात हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या महामारीमुळे मागील 2 महिने संपूर्ण देशात लॉक डाऊन होते, त्यामुळे मागील महिन्यात आपल्या हेस्कॉम या वीज मंडळाकडून वीजबिल दिले गेले नाही आणि ते भरण्याची सक्तीही करू नये असा आदेश सरकारने काढला होता, त्यानुसार हेस्कॉमने या महिन्यात मागील 2 महिन्याचे मिळून बिल देण्यास सुरुवात केली आहे पण हे बिल देताना ग्राहकाच्या घरी जाऊन मीटर रिडींग घेतली नाही तर मनमानी पद्धतीने अनधिकृत रित्या युनिट दाखवून वाढीव बिल दिले जात आहे.
लॉकडाऊन काळात दुकाने व्यावसायिक आस्थापने बंद असून देखील त्यांची विजबिले देखील दुप्पट तिप्पट आली आहेत सर्व विजबिले मागे घेऊन आमच्या खालील समस्यांचे निवारण करून मागण्या मान्य कराव्यात अश्या मागण्या केल्या आहेत.
1) रीतसर मीटर रिडींग घ्यावे आणि सुधारित बिले द्यावीत
2) एप्रिल आणि मे महिण्याचे बिल वेगळे वेगळे द्यावे.
3) लॉकडाऊन मुळे मागील थकीत बिलाच्या वरील दंड माफ करावा
4) सर्वजण आर्थिक संकटात असल्याने पुढील काही महिने कोणाचीही वीज कापू नये.
5) 2 महिण्याचे वीजबिल देताना भरण्याचा तगादा लावला जात आहे आणि जर ग्राहकाने वाढीव दराबाबत प्रश्न विचारला तर संबंधित कर्मचाऱ्या कडून उद्धट उत्तरं दिली जात आहेत, तरी त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा समज द्यावा.
6) गरीब कुटुंबाची विजबिले सरकारने माफ करावीत संबंधित निवेदनाचा स्वीकार करून ताबडतोब यावर तोडगा काढाल ही अपेक्षा आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
वीज बिला बाबत जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत बेळगावातून कोणीही वाढीव बिले भरू नयेत असे आवाहन करत वरील निवेदनावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर उग्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत देत आहोत असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, दक्षिण संघटक सचिन केळवेकर, मनोज पाटील, प्रतीक पाटील, विशाल गौडाडकर आदी उपस्थित होतेनिवेदनाचा स्वीकार करून जर मीटर रिडींग घेण्याच्या पूर्वी वीजबिल दिली जात असतील तर ती स्वीकारू नये, आणि जर मासिक वापराच्या अधिक बिल दिले गेले असेल तर ग्राहकांनी ते बिल न भरता हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लेखी तक्रार दाखल करावी, ज्यांनी मीटर रिडींग घेण्याच्या पूर्वी बिल दिलेले असेल त्या संबधित कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन हेस्कॉमचे डी सी ए शरीफ यांनी दिले.