उद्यमबाग पोलीस स्थानक हद्दीत उत्सव हॉटेल जवळ दिसून आलेली एक संशयास्पद बॅग पोलिसांना डोकेदुखीची ठरली. संशयाने रात्री उशिरा पर्यंत त्या बॅगला हात लावण्यात आलेला नव्हता. उशिरा बॉम्ब तपासणी स्कॉड ला बोलावून पाहणी केल्यानंतर आतमध्ये कपडे व इतर वस्तू आढळल्या. ही बॅग ताब्यात घेऊन पोलिसांनी एक महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
आतील साहित्य व कागदपत्रांवरून ही बॅग एक पश्चिम बंगाल येथील महिलेची असल्याचे उघड झाले आहे. पुरोहित स्वीट्स जवळच्या फुटपाथवर ही बॅग दिसली होती. पोलिसांनी त्या बॅगे वर लक्ष ठेवले होते. पण रात्री उशिरा पर्यंत कुणीच न आल्याने अखेर पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी पुढची कारवाई केली.
पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बॅगे च्या भोवताली कुंपण केले व बॉम्ब तपासणी स्कॉड द्वारे तपासणी करण्यात आली आहे. आता त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. स्थलांतरित कामगार कुटुंबातील महिलेची ती बॅग असावी आणि चुकून राहून गेली असावी असाही अंदाज आहे.सीपीआय दयानंद यांच्या नेतृत्वाखाली आता त्या महिलेचा शोध सुरू आहे.