राज्यात बेळगाव जिल्हा “ऑरेंज झोन”मध्ये असल्यामुळे केंद्र सरकारचे ऑरेंज झोनसाठी असलेले सर्व नियम व कायदे याठिकाणी लागू असणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवहार सोमवार दि. 4 मे 2020 पासून दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
सोमवारपासून दिवसभर सर्व व्यवहार खुले ठेवण्यास परवानगी असली तरीही सायंकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी असणार आहे. लाॅक डाऊनचा कालावधी आता 17 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यासाठी सायंकाळी 7 वाजल्यानंतर पाचपेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र जमू नये अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. कंटेनमेंट झोनमध्ये कोणताही व्यवहार सुरू करण्यास परवानगी नसेल. येथील शाळा – कॉलेजेस, कोचिंग / ट्रेनिंग सेंटर्स, चित्रपटगृहे, जिम, प्रार्थनास्थळे आदी सर्व बंद राहतील. उर्वरित भागात दुकाने खुली केल्यानंतर सामाजिक अंतराचा नियम सक्तीने पाळणे गरजेचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी इन्फ्रारेड थर्मामीटरचा वापर करावा तसेच ग्राहकाने कामगारांसाठी कायम सॅनीटायझरचा वापर केला जावा. टॅक्सीसह 4 चाकी गाड्यांमध्ये चालक आणि अन्य दोघांना प्रवासाची परवानगी असेल. बस सेवा बंद राहील. दारू दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सशर्त खुली ठेवण्यास परवानगी असेल. जीवनावश्यक आणि बिगर जीवनावश्यक वस्तूंसाठी ई-कॉमर्स लागू असेल. बेळगाव जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत काय -काय सुरु असणार आहे, याची माहिती खालील प्रमाणे आहे.
*दवाखाने, ओपीडी सुरक्षित अंतर ठेवून काळजी घेत उघडण्यास परवानगी. * ऑटो रिक्षा टॅक्सी जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या बस. *खाजगी वाहनांना विशिष्ट करण्यासाठी परवानगी, चारचाकी मध्ये मालकाव्यतिरिक्त दोन व्यक्तींना परवानगी, दुचाकी असेल तर एकालाच. *शहरी भागातील औद्योगिक वसाहती, विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातक्षम युनिट. *औद्योगिक वसाहतीमध्ये जीवना वस्तू बनवणारे कारखाने, औषध, वैद्यकीय उपकरणे यासाठी लागणारा कच्चामाल बनवणारी युनिटस्, आयटी हार्डवेअर बनवणारे उद्योग, पॅकेजिंग युनिटस्. *शहरी भागातील बांधकामांना याठिकाणी मजूर उपलब्ध आहेत, त्यांना बाहेरून आणावे लागणार नाहीत अशा ठिकाणी कांही नियमांसह परवानगी.
*शहरी भागातील दुकाने, जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंना मॉल्स, बाजारपेठ आणि संकुलांना परवानगी नाही. अर्थात जी दुकाने निवासी संकुलामध्ये असतील ती उघडी राहू शकतील. *रेड झोन मध्ये जीवनावश्यक वस्तूंची संबंधित ई-कॉमर्सची कामे. *खासगी कार्यालयांमध्ये 33 टक्के उपस्थितीला परवानगी, इतर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा. *ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक आणि बांधकाम यांची कामे मनरेगासह सुरू राहणार; अन्नप्रक्रिया उद्योग, वीटभट्ट्या दुकाने. *मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे आयटी आणि आयटी संबंधित सेवा, डाटा आणि कॉल सेंटर्स, शीतगृहे, गोदाम, खाजगी सुरक्षा सेवा, सलून व्यतिरिक्त स्वयंरोजगाराच्या सेवा. *आंतरजिल्हा प्रवासाला विशिष्ट कारणासाठी परवानगी, चारचाकी गाड्यांच्या चालकासह केवळ दोन प्रवाशांना परवानगी दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी. *50 टक्के क्षमतेसह बसेस लढवण्यास परवानगी, बस डेपो 50 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यरत राहू शकतात. *सर्व प्रकारच्या मालवाहतुकीचा आंतरजिल्हा, आंतरराज्य परवानगी, अशा वाहनांना कोणत्याही नाक्यावर अडवता येणार नाही, या वाहतुकीसाठी वेगळ्या पासची गरज नाही. *दारूची दुकाने, पान – तंबाखू दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी.
At Hanuman Nagar, there is a open gutter beside plot no 8, beside Anugraha Residency (CTS 2208/2A – near Hanuman Mandir and /Emerald Apartment). This gutter is caused because there is no sewer line for the building sewage to connect to the main sewer line. The gutter is too much stinky. It is a grave danger toward human lives as this is a breeding ground for Dengue related mosquitoes. Many time request have been launched with Belgaum municipality. There are PWD officers residing in and around the open gutter. They are also trying to get sewer line built from this gutter, but their effort is in vain. It is a request to the Belgaumlive team if you please bring into the notice of the Municipality, so that big health issues may be averted in near future.
At Hanuman Nagar, there is a open gutter beside plot no 8, beside Anugraha Residency (CTS 2208/2A – near Hanuman Mandir and /Emerald Apartment). This gutter is caused because there is no sewer line for the building sewage to connect to the main sewer line. The gutter is too much stinky. It is a grave danger toward human lives as this is a breeding ground for Dengue related mosquitoes. Many time request have been launched with Belgaum municipality. There are PWD officers residing around the open gutter. They are also trying to get sewer line built from this gutter, but their effort is in vain. It is a request to the Belgaumlive team if you please bring into the notice of the Municipality, so that big health issues may be averted in near future.