बेळगावकरानो आतातरी सावधानता बाळगा. बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता 107 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र तरीदेखील सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बेळगावकर कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत असताना बेळगावकरांच्या दुर्लक्ष पणाचा फटका हा आकडा आणखी किती वर नेऊन ठेवणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिल्या आहे.
आता बेळगावकरांनी सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये संपूर्ण राज्यात 54 रुग्ण आढळले आहेत तर केवळ बेळगावात यामधील बावीस रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बेळगावातील संख्या आता 107 वर जाऊन पोहोचली आहे. याची धास्ती बेळगावकरांना नसल्याचे दिसून येत आहे. कारण सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेच प्रयत्न बेळगावकर करत नाहीत.
त्यामुळे या आकड्यात आणखी भर पडणार यात शंका ही नाही. आरोग्य खाते पोलीस प्रशासन आणि इतर सर्व जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांनी अनेक कायदे पायदळी तुडवत सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि नको त्या कामासाठी बाहेर पडण्याचे धोरण अनेकांना मारक ठरणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे बेळगावकरांनी आतातरी सुधरावे अन्यथा कोरोना संख्येला घटवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनही काही करू शकणार नाही हे दिसून येत आहे.
त्यामुळे सुज्ञान बेळगावकरांनी यापुढे लक्ष देऊन कोरोनाशी लढाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. अजूनही अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावकरांनी यापुढे सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःहून काम करण्याची गरज आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडणार यात शंका नाही, असे जाणकारातून सांगण्यात येत आहे.