पर राज्य तसेच पर जिल्ह्यातून तालुक्यात येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता आरोग्य खाते अशा कार्यकर्त्यां अंगणवाडी कार्यकर्त्यां जोमाने कामाला लागले आहेत. या परिस्थितीत तालुक्यात एकूण 188 जण क्वॉरंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे. तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ही माहिती दिली आहे.
तालुक्यात मागील काही दिवसापासून अनेक जण बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विरोध करत आहेत. मात्र तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी अनेकांची समजूत काढून बाहेरून येणाऱ्यांना क्वॉरांटाइन म्हणून ठेवण्यासाठी शाळा समुदाय भवन तसेच इतर संस्थांमध्ये व्यवस्था केली आहे. दरम्यान तालुक्यातील नागरिकांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत देखील अजूनही ही संख्या पाचशे कडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या 114 जण पुरुष क्वॉरनटाइनमध्ये ठेवण्यात आले आहेत तर 74 महिला म्हणून ठेवण्यात आले आहे. त्यांची सर्वती व्यवस्था ग्रामपंचायत करत आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या जेवण खाणे शौचालय यासह संबंधित ठिकाणी विद्युत बल्प बसवण्याची सोयही करण्यात येत आहे. रविवारी तालुका पंचायतीने जाहीर केलेल्या मार्ग सूचीनुसार 188 जण क्वॉरनटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये मच्छे आणि बंबरगा गावात सर्वाधिक क्वॉरनटाइन म्हणून नागरिकांना ठेवण्यात आले आहे.
अजूनही ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य खाते तसेच ग्रामपंचायतीने दक्षता घेऊन अनेकांना मदत करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना कोणी भेटू नये याचीही दक्षता घेण्यात आली आहे. याकडे प्रशासनही गांभीर्याने लक्ष देऊन आहे.