मागील दोन दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात पावसाची हजेरी लागली आहे. काही ठिकाणी शिडकावा तर काही ठिकाणी जोरात पाऊस पडला आहे. या पावसामुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे तर मशागतीसाठी हा पाऊस पोषक ठरल्याचे ही शेतकरी सांगत आहेत.
लॉक डाऊनमुळे शहर आणि परिसरात शुकशुकाट पसरला आहे. मात्र शेतामध्ये असणारी भाजी व इतर साहित्य या पावसामुळे खराब होणार आहेत. गुरुवारी 30 एप्रिल व शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकांचे गणित कोलमडल्याचे दिसून आले. पाऊस जोराचा नसला तरी शिडकावा पडल्याने काही पिकावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अनेक संस्था शेतातून भाजी आणून ते विक्री करत आहेत. मात्र नुकत्याच पडलेल्या पावसामुळे इतर पालेभाजी खराब होण्याची शक्यता आहे. विशेष करून मेथी पालक शेपू यासह इतर पालेभाज्यांना हा पाऊस मारक ठरला आहे. यापुढे तरी आणखी काही दिवस पाऊस पडू नये अशी शक्यता व्यक्त होत असली तरी मागील दोन दिवसांपासून शिडकावा आणि काही ठिकाणी जोराचा पाऊस पडला आहे.
याआधीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. पुन्हा हजेरी लावल्याने अनेकांतून समाधान व्यक्त होत असली तरी काही शेतकर्यांना फटका तर काहींना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे मशागतीचे काम जोरदार सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.